आम्ही म्हणालो होतो औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करा- नितेश राणे

मुंबई:- आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करा अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर तसं असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनावता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का? मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, अन्यथा काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला.
औरंगाबादच्या नामांतरावरुन उफाळलेल्या वादावर नितेश राणेंनी जोरदार प्रहार केला. “शिवसेनेची लायकी नामकरण प्रकरणावरुन कळली आहे. सेनेलामहाविकास आघाडीमध्ये काडीची किंमत नाही”, असं नितेश राणे म्हणाले.

Post a comment

0 Comments