'दलितांचे तारणहार' बुटा सिंग अनंतात विलिन; मोदीजींनी तसेच राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली : दलितांचे तारणहार समजले जाणारे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता सरदार बूटा सिंग यांचं आज शनिवारी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. २१ मार्च. १९३४ रोजी पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील मुस्तफापुर गावात त्यांचा जन्म झाला होता. तब्बल 8 वेळा ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, श्री बुटा सिंग हे एक अनुभवी प्रशासक आणि गरीब आणि दलितांच्या हितासाठी झटणारा एक प्रभावी आवाज होता.  त्यांच्या जाण्याने खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती तसेच समर्थकांप्रती माझ्या संवेदना आहेत. 
देशाच्या राजकारणात सध्या नाजूक अवस्थेत असलेल्या तसेच आपल्या प्रभावी अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या काँग्रेसच्या अशा अवस्थेत दलित नेते सरदार बुटा सिंग यांचं असं अचानक जाणं ही पक्षासाठी मोठी हानी मानली जात आहे. 

Post a comment

0 Comments