सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्ष ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यासाठी तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात सर्वात प्रथम ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा मान मिळविलेल्या काल्हेर ग्रामपंचायतीवर कित्येक वर्षे शिवसेनेचे अधिराज्य होते. परंतु 2015 मधील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने ही सत्ता खेचून घेतली त्यामुळे सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात चुरशीची निवडणूक होणार आहे. तसेच ही निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद या सर्व नीतींचा वापर केला जाण्याची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, शिवसेना शाखाप्रमुखावर झालेल्या हल्ल्याने येथील निवडणुका वादग्रस्त ठरणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
0 Comments