सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं, लोकभावनेवर चालतं- संजय राऊत

मुंबई :-    मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेचे समर्थन करत संभाजी महाराजांचे नाव वापरणं गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं, लोकभावनेवर चालतं" राऊत यांनी असं म्हटलं आहे. सरकारी ट्विटरवर औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं वापरण्यात आलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेनं सरकारी यंत्रणेचा असा उपयोग करु नये, काय लिहायचं असेल ते सामनामध्ये लिहावं असं म्हटल्याचं सांगितलं. यावर उत्तर देताना राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य असल्याचं म्हटलं आहे.
राऊत म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे. सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं चालतं आणि सरकारनं संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचं नाव सरकारी कागदपत्रांवर किंवा ट्विटरवर वापरणं हा गुन्हा आहे असं मला असं वाटत नाही, शेवटी सरकार हे लोकभावनेवर चालतं" Post a comment

0 Comments