पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधातील अविश्वास ठरावादरम्यान भाजपच्या तीन सदस्यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी

बीड : राष्ट्रवादीला स्वत:च्या सभापतीवर त्यांना अविश्वास का आणावा लागला? हा प्रश्न राष्ट्रवादीला विचारावा लागेल, अशी खोचक टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. परळी पंचायत समितीत सामाजिक न्याय आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का देत भाजपची संख्या शून्यावर आणली. पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधातील अविश्वास ठरावादरम्यान भाजपच्या तीन सदस्यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सभापतींविरोधात अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं. यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडेंनी धनजंय मुंडेंवर जोरदार टीका केली. 
सरकार येऊन अजून वर्ष झालं नाही आणि जर अशापद्धतीने सरकारवर विविध संस्थांवर अशापद्धतीने अविश्वास आणावा लागत असेल. तर हे वातावरण चांगलं आहे, असे मला वाटत नाही,असेही पंकजा मुंडेंनी सांगितले.
भाजपचे पंचायत समितीचे जे सदस्य आहेत, ते आमच्याशी प्रामणिक आहे. ते अविश्वास ठराव झाल्यानंतर थेट मला येऊन भेटले आहेत. हा निर्णय पंचायत समितीच्या कार्यभारावरील असंतोष असलेल्या पद्धतीमुळे घेतला आहे,असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Post a comment

0 Comments