शेतकऱ्याला चिरडून वाळू माफियाचा टिप्पर पसार!!!!या अपघातात शेतकऱ्याच्या शरीराचे अक्षरशः तीन तुकडे झाले.

राक्षसभुवन येथून नदीपात्रातील वाळूचा बेसुमार उपसा सुरू आसतो. हे वाळू माफिया रात्रीतून शेकडो ब्रास वाळू  येथून अवैध पद्धतीने उपसून भरधाव वेगाने वाहन चालवत वाळूची तस्करी सर्रास केली जाते.

बीड, दि. 04 जानेवारी : बीड  जिल्ह्यातील गेवराई  वाळू माफियांच्या उच्छादाची मन हेलावून घटना समोर आली आहे.  शेतकऱ्याला चिरडून वाळू माफियाचा टिप्पर पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याच्या शरीराचे अक्षरशः तीन तुकडे झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. रुस्तुम बाबाजी मते ( वय 65 वर्ष) असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे.   या अपघाता शेतकऱ्याच्या शरीराचे अक्षरशः तीन तुकडे झाले असून वाळू माफियावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेत ग्रामस्थांनी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले आहे.

राक्षसभुवन येथून नदीपात्रातील वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. रात्रीतून शेकडो ब्रास वाळू येथून अवैध पद्धतीने उपसून तस्करी केली जात आहे. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेताकडे निघालेले शेतकरी रुस्तुम बाबाजी मते यांना वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा, टिप्परने अक्षरशः चिरडले. जोरात धडक बसल्यामुळे बाबाजी मते गाडीच्या चाकाखालीच सापडले. या अपघातात बाबाजी मते जागेवरच ठार झाले. त्यांच्या मृतदेहाचे अक्षरश: तीन तुकडे झाले होते.

ही घटना कळताच ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत रस्ता रोखून धरला होता. तसंच अवैध वाळू वाहतूक बंद करून कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत वाळू माफियावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.

Post a comment

0 Comments