मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावार्षिक पुरस्कारांची घोषणा ! कृ.पां. सामक जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना जाहीर


राज्यस्तरीय पुरस्कारासाठी किरण तारे, सिद्धार्थ गोदाम यांची निवड

चंदन शिरवाळे यांनाही उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

 

 मुंबई, दि. 6 : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष तसचे विख्यात लेखक चित्रकार आणि चाळीस वर्षे राजकीय पत्रकारितेची उत्तुंग शिखरे गाजवणारे ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रकाश बाळ जोशी यांना २०२० चा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ.पां. सामक जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

            श्री. प्रकाश बाळ जोशी यांनी १९७२ साली पत्रकारितेला केसरीतून सुरुवात केली. सकाळ, फ्री प्रेस जर्नल, इंडियन एक्प्रेस, द डेली आदि मराठी व प्रामुख्याने इंग्रजी वर्तमानपत्रांबरोबरच २५ वर्षे टाइम्स ऑफ इंडियामध्ये जेष्ठ राजकीय वार्ताहर व विष्लेषक म्हणून कामगिरी बजावली.

             दहा वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडिया मधून निवृत्ती घेतल्यावर त्यांनी चित्रकार म्हणून एका नवीन इंनीन्ग्जला सुरुवात केली आणि त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक कमावला.

            “प्रकाश बाळ जोशी यांच्या ‘कथा” या कथा संग्रहास राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्याचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे. या कथा संग्रहाचे इंग्रजीत "Mirror in the Hall" नावाने भाषांतर झाले आहे. गुजराती, हिंदी, फ्रेंच आणि मल्याळम आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

            पत्रकारितेत कार्यरत असताना पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अनेक लढ्यांमध्ये सहभाग नोंदविला आहे. मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, अखिल भारतीय श्रमिक पत्रकार संघ आदी संघटनांवर त्यांनी अध�

Post a comment

0 Comments