महसुल मंञी बाळासाहेब थोरात यांंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.

मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक औरंगाबाद,दि.०२जानेवारी : महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमात संभाजिनगरचा विषय नाही.त्यामुळे संभाजिनगर नामांतरास काँग्रेसचा स्पष्ट विरोध राहिल असे वक्तव्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे महसुल मंञी बाळासाहेब थोरात यांनी गुरूवारी औरंगाबादेत झालेल्या पञकार परिषदेत करत विरोध दर्शविला होता.
मंञी बाळासाहेब थोरात यांंच्या या बेताल वक्तव्याविरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाला असुन थोरात यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ दि.२ जानेवारी रोजी दुपारी शहरातील हनुमान नगर चौकात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने मंञी बाळासाहेब थोरात यांंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करीत तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.छञपती शिवाजी महाराज व छञपती संभाजी महाराज यांच्या पावन भुमीत महाराष्ट्र घडलेला आहे.महाराष्ट्रात होणाऱ्या अगामी महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना पाडण्याचे काम मराठा क्रांती ठोक मोर्चा करणार असुन यासाठी विभागनिहाय व वार्डनिहाय बैठका,मेळावे घेऊन काँग्रेस विरोधी पञके वाटप करण्यात येईल असा इशाराही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.यावेळी पुंडलीक नगर पोलीसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडुन देण्यात आले.हे आंदोलन मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांंच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले.यावेळी शैलेस भिसे,संतोष काळे,किरण काळे पाटील,मनोज मुरदारे,अप्पासाहेब जाधव,शुभम केरे,कृष्णा उघडे,विजय एरंडे,अनिल शिरवत यांच्यासह आदींची उपस्थीती होती.यावेळी पोलीस आयुक्त कार्यालय विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद खताने व पुंडलीक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनशाम सोणवने यांच्यासह पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a comment

0 Comments