केंद्रात भाजपचे सरकार आहे मग औरंगाबाद नामांतराचा प्रस्ताव का रखडला ? संजय राऊतांचा भाजपला थेट सवाल.मुंबई, दि. ०४ जानेवारी : औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्यावरून राजकीय वाद पेटला आहे. भाजपनेही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पण, औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराज यांच्या नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे तो का रखडला आहे? असा थेट सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांनी भाजपला विचारला आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. तसंच औरंगाबाद  शहराच्या नामाकरणाच्या मुद्यावरून रोखठोक भूमिका मांडली.

'औरंगाबाद शहराबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे हे आशिष शेलार, काँग्रेस आणिअबू आझमी सर्वांना माहिती आहे.  औरंगाबाद शहराचे नामकरण 30 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. त्यावर सरकारकडून सही, शिक्का उमटायला पाहिजे होते. हे काम भाजप सरकारच्या कार्यकाळ होणे गरजेचं आहे. पण, ते अजूनही झाले नाही' असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

Post a comment

0 Comments