आता शाळेची घंटा जूनमध्येच वाजणार

मुंबई  : कोरोनामुळे राज्यातील काही भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. तर मुंबई आणि परिसरातील नववी ते बारावीचे वर्ग अद्यापही सुरू झालेले नाहीत. तसेच पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्यापही केंद्र सरकारने सुचना दिलेल्या नाहीत. यामुळे पहिली ते आठवीची शाळेची घंटा नवीन शैक्षणिक वर्षातच वाजण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. तर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग राज्यातील काही भागात सुरू आहेत. मात्र, मुंबई आणि परिसरातील भागात १५ जानेवारीपर्यंत नववी ते बारावीचे वर्ग भरणार नाहीत. मोठे वर्ग भरले नसल्याने अद्याप पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप शिक्षण विभागाकडूनही हालचाली सुरू झालेल्या नाहीत.
तर याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सचिव विकास गरड म्हणालेत की, पहिली ते आठवीच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्याप केंद्र सरकारकडून सुचना प्राप्त झालेल्या नाहीत. सरकारच्या सुचनेनुसार शिक्षण विभाग निर्णय घेईल. 

Post a comment

0 Comments