खंडणीप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा

पुणे- भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यातील कोथरुढ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा मराठी विद्याप्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकांचे अपहरण करुन त्यांना चाकूचा धाक दाखवून राजीनामे देण्यासाठी दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याचबरोबर ५ लाखांच्या खंडणीप्रकरणी महाजन यांच्यासह २८ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

Post a comment

0 Comments