महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांच नाव निश्चित.

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे  यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. सुबोधकुमार जैस्वाल  यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झाल्यानंतर हे पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर हेमंत नगराळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. हेमंत नगराळे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा १९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी २०१६ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर २०१८  मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार असल्याची चर्चा होती. जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सुबोधकुमार जैस्वाल यांची आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a comment

0 Comments