पालिका प्रशासनाकडून अनधिकृत होर्डिंगबाजी खपवून घेणार नाही, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र संबंधित अतिक्रमण विभागाच्या उदासीन भूमिकेमुळे होर्डिगबाजांनी पुन्हा तोंडवर काढल्याचे दिसून आले आहे.
शहर विद्रूप करणार्या बेकायदा होर्डिंगबाजीला आळा घालण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र स्मार्ट सिटीचे वेध लागलेल्या नवी मुंबईत मात्र या आदेशाला सपशेल हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. कारण या आदेशाची अंमलबजावणी करण्यात खुद्द प्रशासनाकडूनच हलगर्जीपणा केला जात असल्याने फुकट्या होर्डिंगबाजाचे चांगलेच फावले आहे.
0 Comments