कौतुकास्पद पोलीस अधिकारी लेकीला इन्स्पेक्टर वडिलांचा कडक सॅल्यूट!

 


आपल्या मुलांनी मोठं होऊन खूप नाव कमवावं असं प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न देखील करत असतात. आणि याच प्रयत्नांचं चीज करून काही मुलं अपेक्षे पेक्षा ही अधिक काही करून जातात. त्यातल्याच एक म्हणजे जेसी प्रशांती.

जेसी प्रशांती यांनी त्यांच्या आई-बाबांच स्वप्न आपल्या जिद्द आणि यशाच्या जोरावर पूर्ण केलं. जेसी यांच्या धाडसाला आणि मेहनतीला त्यांचे वडील पोलीस निरीक्षक श्याम सुंदर यांनी कडक सॅल्युट केला आहे. बाप-लेकीच्या नात्यातला अभिमास्पद आणि तितकाच भावुक करणारा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जेसी यांचे वडील श्याम सुंदर तिरुपती कल्याणी डेम पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. ३ जानेवारीला आंध्र प्रदेश पोलिसांनी तिरुपती पोलिस ड्यूटी मीट २०२१ हा कार्यक्रम आयोजित केला होता.

दरम्यान, या कार्यक्रमात मुलीच्या वडिलांनी मुलीला केलेलं सॅल्युट पाहून अधिकारी देखील भावुक झाले. श्याम सुंदर हे देखील याच पोलीस मेळाव्यात ड्युटी करत होते. त्याच वेळी त्यांची लेक जेसी त्यांना या कार्यक्रमस्थली दिसली, तिला पाहता क्षणी श्याम सुंदर यांनी आपल्या या कर्तबगार लेकीला कडल सॅल्युट केला.

Post a comment

0 Comments