औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतरावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली.

मुंबई : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतरावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोघांकडूनही एकमेकांवर चांगल्याच शाब्दिक तोफा डागल्या जात आहेत. आता अमोल मिटकरी यांनी थेट बिहारचा संदर्भ देत भाजपची कोंडी केली आहे. भाजपची सत्ता असलेल्या बिहारमध्ये देखील औरंगाबाद नावाचं शहर आहे. त्यावर भाजप काही बोलणार का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केलाय. तसेच अहो दादा, असं मोघलांसारखं का बोलता, असं म्हणत चंद्रकांत पाटलांवर जहरी टीका केली.
अमोल मिटकरी म्हणाले, “अहो दादा बिहारमध्ये पण औरंगाबाद नावाचं शहर आहे असं म्हणतात. त्याबद्दल भाजप सरकार काही बोलणार आहे की नाही? असं मोघलांसारखं काय बोलता. आम्ही “छत्रपती संभाजी महाराजांचं” नाव विमानतळाला देणाऱ्या प्रस्तावास केंद्र सरकारने अजून मंजुरी का दिली नाही?
चंद्रकांत पाटील यांनी याआधी औरंगाबाद महानगरपालिका हातात द्या, दुसऱ्याच दिवशी शहराचं नाव संभाजीनगर करतो असा दावा केला होता. यानंतर अमोल मिटकरी यांनी पाटलांना अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमधील अहमदाबादचं नामकरण कर्णावती करुन दाखवा, असं आव्हान केलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी अहमदाबादचं नाव बदला, उस्मानाबाद पण बदला, माझी काहीच हरकत नाही पण औरंगाबादचं नाव बदलायचं नाही म्हणजे तुमचं औरंगजेबावर प्रेम आहे का? असा जळजळीत सवाल मिटकरींना केला होता.

Post a comment

0 Comments