काँग्रेस-शिवसेनेच्या वादात आम्हाला पडायचं नाही - चंद्रकांत पाटील

वारजे माळवाडी (पुणे) : "औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर हे नामांतर करायचे आहे. हा आमचा राजकीय मुद्दा नाही. निवडणुकीचा नाही, तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध आहे, तर शिवसेनेला नामांतर पाहिजे आहे. त्यामुळे यात आम्हाला पडायचं नाही," असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
कोथरूड- कर्वेनगर येथील कार्यक्रमापूर्वी पाटील पत्रकारांशी बोलत होते. सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगर अशी मागणी केली आहे. तुम्ही गोधड्या वाळवत आहात असं म्हणता, तर मग आता नामांतर करा. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल, तर औरंगजेबाचं तरी नाव कशाला पाहिजे? ते ही हटवा, असे पाटील म्हणाले. 

Post a comment

0 Comments