भारतात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेची रंगीत तालिम शनिवारी होणार

नवी दिल्ली - भारतात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेची रंगीत तालिम शनिवारी होणार आहे. यादरम्यान, व्हॅक्सिनबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकांना याबाबत सावध केलं आहे. त्यांनी सांगितलं की, काहीच विचार न करता, समजून न घेता माणसांचे कितीतरी नुकसान होईल. कित्येक अफवा पसरवल्या जात आहेत आणि अजुनही परसवल्या जातील. पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन मोदींनी केलं. व्हॅक्सिनबाबत कोणत्या 
कोरोना व्हॅक्सिनमध्ये डुकराची चरबी?
फायजर, मॉडर्ना, एस्ट्राझेनकाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे की, व्हॅक्सिनमध्ये डुकराचे मांस वापरेलं नाही. व्हॅक्सिनन साठवण्यासाठी, तसंच सुरक्षित आणि प्रभावी रहावी यासाठी डुकराच्या मांसाचा वापर करून तयार केलेल्या जिलेटीन वापरले जाते. मात्र काही कंपन्या डुकराचे मासं न वापरता लस तयार करण्यावर कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. स्वित्झर्लंडमधील औषध कंपनी नोवारिटसने डुकराचे मांस वापरून मॅनिंजाइटिस लस तयार केली होती. तर सौदी, मलेशियातील कंपनीही अशा प्रकारची लस टयार कत आहेत. 
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर व्हॅक्सिन प्रभावी नाही?
कोरोनाचे रुग्ण कमी झाले असताना आता नव्या स्ट्रेनचा धोका निर्माण झाला आहे. फायजर आणि मॉडर्नाच्या व्हॅक्सिनला अमेरिका आणि ब्रिटनमध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. या व्हॅक्सिनला कोरोनाचे प्रोटीन ओळखून शरिरात त्याच्याविरोधात अँटिबॉडी तयार करण्याच्या दृष्टीने विकसित केलं आहे. यामुळे शऱिरातील सेल्सला काही नुकसान नाही. मात्र जर नव्या स्ट्रेनमध्ये प्रोटिनमध्ये बदल करण्याची क्षमता असेल तर व्हॅक्सिन प्रभावी ठरेल का? तज्ज्ञांनी म्हटलं की व्हॅक्सिन तेव्हाही प्रभावी ठरेल कारण हा प्रोटीनमधील बदल दुर्मीळ असा आहे. व्हॅक्सिनसुद्धा बदलाप्रमाणे स्वत: अपडेट होत असते. म्हणजे व्हारयसमध्ये होणाऱ्या बदलानंतरही प्रभावी राहिल. फायजर आणि मॉडर्ना व्हॅक्सिनबाबत चांगली गोष्ट ही आहे की, सार्स Cov-2 सारख्या व्हायरसमध्ये आपोआप बदल करू शकते. ब्रिटनच्या पब्लिक हेल्थ इंग्लंडनेसुद्धा गेल्या महिन्यात सांगितलं होतं की, फायजरची व्हॅक्सिन नव्या स्ट्रेनविरोधात प्रभावी नाही याचा कोणताच पुरावा उपलब्ध नाही. 

Post a comment

0 Comments