काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी सोनिया गांधी आणि बमायावती यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी ट्विटरवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यांच्या याच मागणीवर भाजप नेते अतुल भातकळकर यांनी खोचक टोला लगावला आहे.
जगात भ्रष्टाचाराचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्यांसाठी असते का एखादे भारतरत्न?”, असा सवाल अतुल भातकळकर यांनी उपस्थित केला आहे.
सोनिया गांधी आणि मायावती मोठ्या राजकीय व्यक्तीमत्व आहेत. त्यांच्या राजकीय निर्णयांशी तुम्ही सहमत असाल किंवा नसाल, पण सोनिया गांधी यांनी भारतीय महिलांचा सन्मान आणि सामाजिक समर्पण तसेच जनसेवाच्या मापदंडांना नव्या उंचीवर नेऊन ठेवल्याचं कुणीही नाकारु शकत नाही. आज त्यांना भारतीय महिलेचे गौरवशाली रुप मानलं जातं. त्याचबरोबर मायावती यांनी पीडित-सोशित लोकांच्या मनात अद्भूत विश्वास निर्माण केला आहे. भारत सरकारने यावर्षी या दोन्ही महिलांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं”, असं हरिश रावत ट्विटरवर म्हणाले.

Post a comment

0 Comments