गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा.

मुंबई:- पूर्व विदर्भ वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिली. मुख्यमंत्री यांनी अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आढावा घेऊन निधी तसेच भूसंपादनासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. गोसेखुर्द प्रकल्पाच्या अपूर्ण राहिलेल्या भूसंपादनास संदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करावे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
पूर्व विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. गोसेखुर्द प्रकल्प हा पूर्व विदर्भातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.
या प्रकल्पामुळे नागपूर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याला सिंचनासाठी मोठा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची एकूण सिंचनक्षमता २ लाख ५० हजार ८०० हेक्‍टर एवढी आहे. या प्रकल्पात एकूण जलसाठा ११४६.०७५ दशलक्ष घनमीटर एवढा राहणार आहे.
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार गौतम विभागीय आयुक्त संजीवकुमार, अधीक्षक अभियंता अंकूर देसाई,  विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments