यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "तुम्ही सतत ताणतणावात असता. नववर्षाची सुरुवात माझ्या बहाद्दर कुटुंबीयांच्या समवेत उपस्थित राहून करावी या जाणिवेने मी महाराष्ट्र आणि मुंबईतील नागरिकांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. तुम्हाला हे वर्षच नाही तर पुढील अनेक वर्षे सुखाची, समाधानाची, भरभराटीची आणि ताणमुक्ततेची जावो, अशी प्रार्थना करतो. दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती जी काही नियंत्रणात आहे ती पोलिसांमुळेच", असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
0 Comments