जळगावात महाविकास आघाडीत फूट

जळगाव : भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे  यांच्या जळगाव जिल्ह्यातच महाविकास आघाडीत फूट पडली आहे. जळगावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आता परंपरागत शत्रू असलेल्या भाजपसह मित्रपक्षांविरुद्ध मोट बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे. कोरोना काळात ग्रामीण पातळीवर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने राजकीय पक्षांमध्येही उत्साह वाढला आहे. राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी जळगाव जिल्ह्यात मात्र काँग्रेसने या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे.

Post a comment

0 Comments