सेल्फीच्या नादात धरणात पडून एका तरुण पर्यटकाचा म्रुत्यु.

नाशिक, दि.०५. जानेवारी : गिरणा धरणावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा सेल्फी काढताना तोल गेल्याने धरणात बुडून मृत्यू झाला. 
डिजिटल युगातला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. हल्ली सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही समारंभात दिसणारं एक ठळक दृश्‍य म्हणजे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात स्वतःची किंवा स्वतःसोबत इतरांची छायाचित्रं टिपणारी मंडळी...

अगदी लग्नसमारंभांत वर-वधू भेटीला आलेल्या पाहुण्यांचं भान विसरून मित्रांसोबत सेल्फी घेताहेत, हे दृश्‍य आपल्या सवयीचं झालं आहे. आपल्या रोजच्या जगण्यात शिरलेली ही गोष्ट कधीतरी स्वतःचं आणि भवतालाचं भान विसरायला लावते आणि त्यातून होतात ते जीवघेणे अपघात...आणि आपण आपल्या परिजनांना कायमचे गमावून बसतो. 

गिरणा धरणावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा सेल्फी काढताना तोल गेल्याने धरणात बुडून मृत्यू झाला. चाळीसगाव येथील नयन रवींद्र शिरुडे हा तरुण पर्यटनासाठी मित्रांबरोबर गिरणा धरणावर आला होता. सुरक्षारक्षकाची नजर चुकवून तो धरणाच्या काठावर उभा राहून सेल्फी काढत असताना तोल जाऊन धरणात बुडून त्याचा मृत्यू झाला. मालेगावातील अग्निशमन दलाच्या शकील अहमद मोहंमद साबीर, रवींद्र शेजवळ, सुधाकर अहिरे, किरण सूर्यवंशी यांनी शोध घेऊन धरणातून त्याचा मृतदेह काढला. सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
 

Post a comment

0 Comments