नववर्षाच्या ह्या सेलिब्रेशन चांगलीच चर्चा होत आहे, रविकांत तुपकरांनी खालली शेतकऱ्यासोबत चटणी-भाकरबुलडाणा, दि. ०१ जानेवारी  : साधारणतः सरत्या वर्षाला निरोप देत असताना या वर्षाच्या अखेरच्या दिवशी, म्हणजेच 31डिसेंबरला वेगवेगळ्या प्रकारे हा दिवस साजरा करण्याला अनेकांचं प्राधान्य असतं.
कुणी या दिवसासाठी शहराबाहेर जाणं पसंत करतं, तर कुणी मित्रांसोबत हा दिवस साजरा करण्याला प्राधान्य देतं. यात अगदी नेतेमंडळीही मागे नाहीत. अशाच एका नेत्याची थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनची धमाल सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यामागं कारणंही तसंच आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी गाव. येथील श्रीकृष्ण काळवाघे यांच्या शेतात रात्री गव्हाला पाणी देवून परिसरातील शेतकऱ्यांसोबत रात्र घालवली. शेतकऱ्यांसोबत चटणी - भाकर खावून जेवण केले. यावेळी तुपकरांमधील शेतकरी बघायला मिळाला. स्वतः तुपकरांनी शेतात उतरून पिकाला पाणी देण्याचे काम केले.

सरकारवर साधला निशाणा
उद्योगांना पूर्णवेळ वीज, पाणी मिळते व पायाभूत सुविधा मिळतात. पण शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा तर सोडाच साधी पूर्ण वेळ वीजही मिळत नाही. मिळते ती तर रात्री फक्त 8 तासच..! जंगली जनावरे, साप-विंचू काट्याची पर्वा न करता शेतकरी अन्नधान्य निर्मितीचे काम करतो..अंबानी-अदानी ला वेगळा न्याय आणि शेतकऱ्यांना वेगळा न्याय का..? असा सवाल उपस्थित करत तुपकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नवीन वर्षात तरी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत अशी मागणी करत शेतकऱ्यांचं माणूस म्हणून जगणं सरकारने मान्य केले पाहिजे, अशी अपेक्षा स्वाभिमानीचे रवीकांत तुपकर यांनी व्यक्त केली.

Post a comment

0 Comments