राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती, समस्या असल्यास थेट 'या' नंबरवर करा कॉल



मुंबई, दि. 9 जानेवारी : राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. काही समस्या असेल तर पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 18002330418 वर त्वरित संपर्क करुन त्याची माहिती द्यावी, असं आवाहन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केलं आहे.
सुनील केदार म्हणाले की, मुंबई येथे 3 कावळे, ठाणे येथे 15 बगळे (इंग्रेटस) व 2 पोपट या पक्षांचे तसेच परभणी येथे एका कुक्कुटपालन फार्ममधील 800 पक्षांचे, दापोली येथे 6 कावळे व बीड येथे 11 कावळ्यांचे मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासण्यांचे काम सुरू आहे. तसेच सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील निशाद प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास 48 ते 72 तास लागू शकतात.

Post a comment

0 Comments