भाजप नेते वसंत गिते आणि सुनील बागुल यांची संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.

नाशिक : वसंत गीते आणि सुनील बागुल  यांच्या शिवसेना प्रवेशाचे सर्वांनी स्वागत केले आहे. कुणाचा पक्षप्रवेश होत असला की वाद निर्माण होतात. या ठिकाणी मात्र सगळे आनंदात आहेत. येथे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. गीते आणि बागुल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सर्वांना आनंद होत आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेना विस्तारण्यास मदत होईल,असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच, गीते आणि बागुल यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची भगवी शाल अधिक उबदार आणि तेजस्वी झाल्याची भावना राऊत यांनी व्यक्त केली. नाशिकमध्ये पूर्वाश्रमीचे भाजप नेते वसंत गिते आणि सुनील बागुल यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज (८जानेवारी) शिवसेनेत प्रवेश केला. 
यावेळी बोलताना नाशिक हा पुन्हा एकादा शिवसेनेचा बालेकिल्ला होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा गड होण्यासाठी बागूल आणि गीतेंचे योगदान महत्त्वाचे असेल.

Post a comment

0 Comments