शनि, बुध आणि गुरु हे तिनही ग्रह एकत्र दिसणार

मुंबई :  ९ आणि १० जानेवारीच्या रात्री आकाशात एक असं दृष्य दिसणार आहे.  येत्या ९ आणि १० जानेवारीला सूर्यास्तानंतर अंतराळात शनि, बुध आणि गुरु हे तिनही ग्रह एकत्र दिसणार आहेत.
हे दृष्य ८ आणि ११ जानेवारीलाही दिसणार आहे. पण, स्पष्टपणे हे 9 आणि १० जानेवारीच्या रात्री दिसेल. नवं वर्ष २०२१ मधील ही पहिली रोमांचक खगोलशास्त्रीय घटना असेल.२०२० मध्ये २१ डिसेंबरला गुरु आणि शनियांच्या मुळे  सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यादरम्यान, शनि (Saturn) आणि गुरु (Jupiter) अत्यंत जवळ आले होते. पण, या दोन ग्रहांमधील अंतर ७३.५कोटी किलोमीटर होतं. पण, तरीही आकाशात ते अत्यंत जवळ दिसत होते.
यापूर्वी शनि आणि गुरुला इतकं जवळ 1623 मध्ये पाहिलं गेलं होतं. आता शनि आणि गुरु जरी दूर झाले असतील तरी आता बुध (Mercury) यांच्यामधे आला आहे. 9 आणि 10 जानेवारीला तिन्ही ग्रह एकत्र येऊन त्रिकोण बनवतील.

Post a comment

0 Comments