ड्रग्ज घेतल्याप्रकरणी मिरा रोड येथील हॉटेलमध्ये टॉलीवूड अभिनेत्रीला एनसीबीकडून अटक

मुंबई : बॉलीवूडचे ड्रग्ज कनेक्‍शन एकामागून एक समोर योत असताना आता टॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्‍शनचाही एनसीबीने पर्दाफाश केला आहे. मिरा रोड येथे एका हॉटेलमध्ये अभिनेत्रीला एनसीबीने रंगेहाथ ड्रग्ज घेताना पकडले. अखेर तिला याप्रकाराणी सोमवारी अटक करण्यात आली. 
श्‍वेता कुमारी असे या टॉलीवूड अभिनेत्रीचे नाव आहे. या ठिकाणाहून एनसीबीने सुमारे १० लाख रुपये किमतीचे ड्रग्ज ताब्यात घेतले आहे. मिरा रोड येथील क्राऊन बिझानेस हॉटेलमध्ये एनसीबीने छापेमारी केली. या वेळी ड्रग्ज वितरक सईद याला अटक करायला गेले असताना ही अभिनेत्रीही त्याच्यासोबत असलेली समोर आली. अभिनेत्रीसोबतचा वितरक फरारी झाला असून, अभिनेत्रीला एनसीबीने अटक केली. हॉटेलचे संचालक आणि हॉटेल बरेच दिवस एनसीबीच्या रडारवर होते. एनसीबीला माहिती कळताच त्यांनी हॉटेलवर छापा मारून ड्रग्ज जप्त केले. 

Post a comment

0 Comments