सफारी’ ब्रँड पुन्हा एकदा परतणार.

मुंबई : टाटा मोटर्स कंपनी लवकरच भारतात त्यांचा ‘सफारी’ ब्रँड पुन्हा एकदा सादर करणार आहे. आधी या SUV चं नाव अस ग्रॅवितास ठेवण्यात आलं होतं. सर्वात आधी ही कार २०२०  Auto Expo मध्ये सादर करण्यात आली होती. Tata ची ही फ्लॅगशिप SUV असेल आणि ही ७-सीटर कार असेल. ही कार या वर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटी लाँच केली जाईल.
या एसयूव्हीसाठी (Tata Safari) लवकरच प्री-लाँच बुकिंग सुरु केलं जाण्याची शक्यता आहे. ऑल-न्यू सफारी ही 5-सीटर हॅरियरचं व्हेरियंट आहे. ही कार २०१९ च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. टाटा मोटर्सचे हेड शैलेश चंद्र त्यांच्या आगामी एसयूव्हीच्या ऑपचारिक ब्रँडिंगची घोषणा करताना म्हणाले की, “आम्हाला पुन्हा एकदा आमची एसयूव्ही-सफारी सादर करण्याची तयारी करत असताना खूप अभिमान वाटतोय आणि तितकाच आनंदही होत आहे.
हेड शैलेश चंद्र म्हणाले की, सफारी एक मजबूत आणि प्रतिष्ठित ब्रँड आहे. देशातील ग्राहकांनी दोन दशकांहून अधिक काळ या कारला पसंती दिली आहे. या कारचा नवीन अवतार अधिक दमदार आहे. या कारची रचना, कार्यक्षमता, मल्टी टास्किंग, सेवा आणि दीर्घकाळ टिकणारी डेव्हलपमेंट क्वालिटी या एसयूव्हीला पूर्वीपेक्षा अधिक दमदार बनवते. आता आम्हाला या कारच्या लाँचिंगची प्रतीक्षा आहे.

Post a comment

0 Comments