धनंजय मुंडे राजीनामा द्या !!भाजपा युवा मोर्चा आंदोलन काढणार

पनवेल, दि. १४ जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला होता. तक्रारदार तरुणीच्या बहिणीशी माझे संबंध होते आणि मला तिच्यापासून दोन मुले आहे, असेही मुंडेंनी स्पष्ट केले होते. 

या प्रकरणाहून मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली आहे, मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर राज्यभर भाजपयुवामोर्चातर्फे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा विक्रांत पाटील यांनी दिला आहे. 
धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे अथवा निवृत्त न्यायाधीश यांच्या समितीकडे सोपवावा व शर्मा भगिनींना संरक्षण द्यावे, असेही विक्रांत पाटील म्हणाले आहेत. दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याने आणि त्याचा उल्लेख निवडणूक प्रतिज्ञापत्रात न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द व्हावे, द्विभाऱ्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले असल्यास कार्यवाही व्हावी, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर निषेध आंदोलने करणार असल्याचा इशारा विक्रांत पाटील यांनी दिला आहे.

या सगळ्या वादात मुंडे यांचे समर्थक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे चित्र आहे. मुंडे समर्थकांनी म्हटले आहे की, कालपासून सगळीकडे जी बोंबाबोंब चालू आहे, ती केवळ ब्लॅकमेल करण्यासाठी आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. वर्षभरापूर्वीपासून याची तयारी समोरील महिलांनी सुरू केली आहे. परळीतील लोकांना मुद्दामहून फेसबुकवरुन रिक्वेस्ट पाठवणे, त्यांच्याशी बोलणे, आम्हाला परळीत घर बघून द्या म्हणणे असे अनेक प्रकार मागील वर्षभरापासून सुरू आहेत. 
 
'मैं जानबुझकर परळीके लोगो से कॉन्टॅक्ट कर रही हूँ', असे बोलणे म्हणजे ब्लॅकमेल करणे नाहीतर काय, असा सवालही मुंडे समर्थकांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या महिलेने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंडेंचे कौतुक केले होते.  "डीएम के पास जनता का बहोत प्यार है, उसने इतने सालो मे बस लोगो का प्यार कमाया है,वो लोगों के प्रति, परली के प्रति बहोत इमानदार है', असे त्यावेळी ती म्हणाली होती. आता ती महिला अचानक बहिणीला समोर करून त्याच डीएमला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते हे म्हणजे ब्लॅकमेलिंग नाही तर काय ?  

असो त्यांनी कितीही असे प्रकार केले तरी आम्हाला माहिती आहे की धनंजय मुंडे त्यांच्याबाबतीत कुठेतरी हळव्या मनाचा असल्याचा फायदा या महिला घेत आहेत. त्यामुळे काहीही झालं तरी आम्ही सदैव धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी आहोत. कुठवर गप्प बसणार आम्ही तरी, असे मुंडे समर्थकांनी स्पष्ट केले आहे. 
 

Post a comment

0 Comments