माध्यामांचे शिक्षण देणाऱ्या संस्थांनी नौकरा पेक्षा मालक निर्माण करावेत -प्रा.जयदेव डोळे दर्पण दिन विशेष वार्तालाप कार्यक्रमात माध्यमांच्या वर्तमानावर चर्चा !


औरंगाबाद, दि. ०६ जानेवारी : माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांनी फक्त पत्रकार म्हणून नौकरी करणा-या व्यक्ती तयार करण्यापेक्षा मालक तयार करण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे मत जेष्ठ माध्यम समिक्षक प्रा. जयदेव डोळे यांनी व्यक्त केले .ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने आयोजित दर्पण दिनानिमित्त विशेष वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.
आता काळ बदलला आहे. सध्या माध्यामांच्या मालकांना व संपादकांना जे हवे असते ते लिहावे लागते. अनेक माध्यामांचे मालक राजकीय नेते आहेत किंवा त्यांच्या सोबत हितसंबंध आहेत. म्हणून आता पत्रकारिता शिल्लक राहिली नाही तर फक्त हितचिंतकांचे हीतच शिल्लक राहिले आहे.
माध्यमं एखाद्या व्यक्तीला नेता बनवू शकतात तसेच नेत्यांना घरी देखील बसवू शकतात. म्हणून बातमी करत असताना जास्तीत जास्त आकडेवारी, कोट, प्रत्यक्ष माहिती देणा-याचे नाव यासारख्या अनेक बाबतीत सखोल माहिती दिली पाहिजे. कारण एक बातमी ही दैनिकाचे चार ते पाच व्यक्ती तपासणी करून प्रकाशित करत असतात आणि ती बातमी लाखो लोक वाचतात. बातमी करत असताना ठोस, ठाम भूमिका घेतली पाहिजे. आपणच संभ्रमात राहिलो तर योग्य माहिती वाचकांना देऊ शकत नाही. लोक आजही दैनिकातून बातमी छापून आली म्हणजे तेच अंतिम सत्य मानतात. दैनिकांना रोज नवीन प्रोडक्ट निर्माण करावे लागते म्हणून पत्रकारांनी बहुआयामी विचार स्विकारला पाहिजे. नवीन येत असलेले तंत्रज्ञान आत्मसात करून ते स्विकारले पाहिजे.प्रा.जयदेव डोळे यांनी यावेळी उदाहरणांसह बाळशास्त्री जांभेकर ते अर्णव गोस्वामीपर्यंतच्या इतिहासावर अितशय मार्मिक भाष्य करुन भविष्यात वर्तमानपत्रकर्त्यांनी राजकीय दबावाला न जुमानता पत्रकारिता करावी व जांभेकरांचा वारसा समर्थपणे चालविण्याचे आवाहन केले. 
यावेळी प्रा.डॉ. प्रभू गोरे, छबुराव टाके, विलास शिंगी, मुकेश मुंदडा, मनोज पाटणी, निलम कांबळे, जाँन भालेराव, फोटोग्राफर माजेद खान यांच्यासह विविध माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी सखोल वाचन केले पाहिजे !
कोरोना काळात लाँकडाउनमध्ये अनेक पुस्तके वाचली. विषेश म्हणजे सोशल मीडियावर देखील पुस्तके वाचली. आताच्या विद्यार्थ्यांना एवढे मोठे वाचनालय असुन देखील ते वाचत नाही याची खंत वाटते.चांगला पत्रकार होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सखोल वाचन केले पाहिजे.           

‌‌दैनिके कधीच बंद पडणार नाहीत
सोशल मिडिया कितीही वाढला तरी त्यावर लोकांचा विश्वास नसतो. तसेच दैनिकांचे दर वाढवले तरीही ते कधीच बंद पडणार नाहीत. फक्त त्यामध्ये आपल्याला दर्जेदार लेखन करावे लागेल. मुद्देसुद मांडणी, जास्तीत जास्त प्रमाणात माहिती दिली तर आजही वाचकांचा विक्ष्वास हा माध्यामावर आहे.

Post a comment

0 Comments