इम्रान खान यांच्या ड्रायव्हरने सौदीच्या अब्जाधीश महिलेशी लग्न केल्याचा व्हिडीओ खुपच चर्चेत आहे.

इस्लामाबाद, दि.2 जानेवारी : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या ड्रायव्हरने सौदी अरेबियाच्या अब्जाधीश महिला व्यापारी सोबत लग्न केल्याचा दावा करणारी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या लग्नाच्या बाजूने आणि विरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.तर हा दुसऱ्या एका अरब लग्नातला व्हिडीओ आहे, असा दावा काही जणांनी केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी इम्रान खान यांचं ट्रोलिंग सुरु केलं आहे.
या व्हिडीओमधील महिला सौदी अरेबियातील श्रीमंत व्यापारी परिवारातील असल्याचा दावा केला जात आहे. साहू बिंत अब्दुल्लाह अस महबूब असं त्यांचं नाव आहे. साहू यांचं मक्का आणि मदिना या शहरांसह फ्रान्स आणि अन्य देशांमध्ये हॉटेल तसंच मोठी संपत्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती 8 अब्ज डॉलर्स असल्याचा दावा केला जात आहे.

Post a comment

0 Comments