शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश .

मुंबईः सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे  यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.  महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून सेना-राष्ट्रवादीत काहीसा तणाव होता. हा प्रवेश लांबण्याची शक्यता होती. मात्र अखेर खुद्द शरद पवारांच्याच उपस्थितीत महेश कोठे हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.
महेश कोठे यांचे समर्थक असलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक महेश कोठे हे अनेक दिवसांपासून शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती. अखेर कोठे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय. महेश कोठे यांचे निकटवर्तीय समर्थकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. रियाज मुमिन, माजी नगरसेवक राज महेंद्र कमकम, युवराज चुंबडकर, सलाम शेख, युवराज सर्वडे, नितीन करवा, शाम पांचारिया, बाजू जमादार, परशुराम भिसे यांनी कोठेंबरोबर राष्ट्रवादी प्रवेश केलाय.

Post a comment

0 Comments