Advertisement

Responsive Advertisement

रोजाबाग वार्ड क्रमांक 10 मध्ये पक्षातर्फे जनजागृती कार्यक्रम व विविध पक्षातील युवकांचा काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.

औरंगाबाद - वार्ड क्रमांक दहा रोजेबाग येथे औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जनजागृती अभियानाच्या कार्यक्रम घेण्यात आला. त्यात पेट्रोल डिझेल गॅस तसेच इतर खाद्यपदार्थांचे वाढत चाललेले भाव याबद्दल या वार्डातील रहिवाशांना याबाबत सविस्तर पणे शहर जिल्हाध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी माहिती दिली या वॉर्डातील विविध पक्षातील युवकांनी या कार्यक्रमामध्ये काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश घेतला सर्वांना काँग्रेस पक्षाचे मफलर टाकून खालील विविध पक्षातील युवकांना सामाजिक कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात शहर जिल्हाध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या हस्ते पक्ष प्रवेश देण्यात आला. अब्दुल रहीम शेख बाबा शेख शेख सत्तार अजीम खान संजय गायकवाड  बीलाल पटेल,  शेख  अजीम, शेख जाविद,रमेश. इस्माईल बेग, संजय जाधव, सईद चाऊस,मिर्झा हारून बेग, सलमान बिन तयब, हकीम टेलर. इत्यादींनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर जिल्हाध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी आज देशात वाढत चाललेली महागाई बेरोजगारी विविध स्वरूपाने होत चाललेले खाजगीकरण यावर सविस्तर पणे उपस्थितांना मार्गदर्शन केले व आज देशात  निर्माण झालेली जातीय स्वरूपाचे परिस्थिती वाढलेला जातीवाद यामुळे देशाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे सांगितले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद लईक मामू यांनी केले तर आभार शेख सत्तार यांनी केले. या प्रसंगी मोईन शेख हर्सूलकर, डॅ. शादाब शेख, मोहसिन शेख आदी उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या