Advertisement

Responsive Advertisement

विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.        औरंगाबाद - औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हीशाम उस्मानी यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयामध्ये औरंगाबाद शहरातील विविध पक्षातुन विविध वार्डातील सक्रिय कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. 
यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद  हीशाम उस्मानी यांच्या हस्ते पक्षाचे मफलर टाकून अधिकृतपणे पक्ष प्रवेश देण्यात आला.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव पवन पाखरे रा. सातारा परिसर, समता परिषद शहर संघ्घटक दिनेश जाधव रा. एन-6, राष्ट्रवादी काँग्रस ग्राहक सौरक्षण विभग शहर अध्यक्ष जय शिरसाट रा. जय भवानी नगर, राहुल मंगेश खिल्लारे रा. इंद्रा नगर, गणेश कोल्हे रा. इंदिरा नगर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
 या पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमात औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हीशाम उस्मानी यांनी सर्वांना विविध वार्डात जाऊन लोकांच्या समस्या बघावे लोकांची कामे करावी विविध वार्डातील समस्या पक्षातर्फे सोडवण्यासाठी पक्षातर्फे निवेदन  आंदोलन उपोषणे या माध्यमाने सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून सर्वांनी मिळून पक्षबांधणीसाठी मजबुतीसाठी काम करावे पक्ष नेहमीच आपल्या सोबत आहे. असे सर्व प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. आपण सर्वांनी पक्षबांधणीसाठी मजबुतीसाठी काम करावे पक्ष नेहमीच सर्वसामान्य जनतेसोबत आहे खालील सर्व प्रतिष्ठित विविध वार्डातील व्यक्तींनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. या वेळी विजय पटेकर व इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या