Advertisement

Responsive Advertisement

सोळावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद निमित्ताने फर्दापुर येथे भन्ते बोधी धम्मा आवाहन...भव्य दिव्य बैठकीत उपोसक -उपाशीकांचा उत्फुर्स सहभाग.


सोयगाव-
 ता. १९ नोव्हेंबर डॉ . बाबासाहेब आंबेडकर रिसर्ज इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँन्ड बुथ्दीझमच्या   विद्यमाने आयोजित  शुक्रवारी रोजी होणाऱ्या १६ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद निमित्त भन्ते बोधी धम्मा,भन्ते संघरत्न यांनी (रविवारी) समाज बांधवांची बैठक घेऊन त्यात नियोजनाची रुपरेषा विषयी इत्यंभूत मार्गदर्शन केले.  
फर्दापुर ता.सोयगाव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्ण पुतळ्या समोर महत्वपुर्ण झालेल्या बैठकीत बोद्ध उपासक - उपासिकांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाची रूप रेषा सांगण्यात आली. ता. १९ नोव्हो.शुक्रवारी सकाळी ९:०० वाजता सर्व उपासक उपासिका यांनी धम्म रॅली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन व पुष्पहार अर्पण करून पुढे धम्मा चल च्या दिशेने जाणार यावेळी सर्व उपासकांनी शांन्ती प्रतिक पांढरे वस्त्र परिधान करून मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले . दरम्यान कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी धंम्माचल परिसरात श्रमदान करावे, श्रद्धावान उपासकानी शक्य असेल तितके अर्थदान, अन्नदान,जलदान करुन पुण्यकर्म अर्जित करावे असे आवाहन यावेळी केले. त्यावेळी मोठया संख्येने विशाखा  महिला मंडळाच्या उपासीका व उपासक उत्फुर्सने मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या