Advertisement

Responsive Advertisement

मौ.टेभी येथे वाल्मीकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली


नांदेड जिल्हा प्रतिनीधी:
नांदेड:हिमायतनगर तालुक्यातील मौ.टेभी येथे दि.11रोजी बुधवार महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी 11वाजता महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेस पुजन करुन झेंडावंदन मौ.टेभी गावचे सरपंच आनंदराव मुतनेपाड यांच्या हस्ते करण्यात आला.
गावातील समाज बांधव माता भगिनी बाल गोपाल मोठ्या प्रमाणात कार्यक्रमात यांची उपस्थित लाभली,त्यानंतर जयंतीनिमित्त आलेल्या प्रतिष्ठित नागरिकांच जयंती मंडळांच्या वतीने शाल श्रीफल देवून सत्कार करण्यात आला आहे.
कोळी राष्ट्रसंघ नांदेड जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जंगेवाड पुढे म्हणाले की,कोळी समाज बांधव हा एकजूट झाला पाहीजे, एकजूट झाल्याशिवाय आपले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र विषय मिटणार नाही,आणी समाजातील महीलांना कोणीही त्रास देवु नये,आपसातील भांडण पोलीस ठाण्यात फिर्याद नेन्या ऐवजी चार माणसं बसवून तंटा मिटुन घ्यावेत जर कोणी समाजातील व्यक्ती आयकत नसेल तर त्यांची गय केली जाणार नाही.
आपले जात प्रमाणपत्र काढून घ्यावेत,
मुलांना आई-वडीलांनी शिक्षण शिकवल पाहीजे एक चांगली वागणूक दिली पाहिजे,आपला मुलगा शिक्षण शिकवून मोठ्या पदावर गेला तर समाजात त्याच व तुमच नाव लौकीक होईल,बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीप्रमाणे "शिका व संघटीत व्हा"असेही ते समाजाला संबोधीत केल.
सदर वरीष्ठ अनेक नेत्याचे भाषणे झाली, आणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आला होता. यावेळी,कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री.आनंदराव मुतनेपाड प्रमुख पाहुणे म्हणून,कोळी राष्ट्रसंघ मराठवाडा उपाध्यक्ष मा.श्री.उद्धव भाऊ मामडे रावधानोरकर,जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जंगेवाड भाऊ,जिल्हा सचिव मारोती जंगेवाड रायखोडकर, हदगाव तालुकाध्यक्ष राजु गुंडेवाड,किनवट तालुकाध्यक्ष गजानन सोमेवाड श्रीकांत करडेवाड, मारोती करडेवाड, गंगाधर मामीलवाड, बालाजी करडेवाड ह.ता.संघटक,अशोक कदम, माधव येटेवाड, अंकुश रेखेवाड, परमेश्वर डिवटेवाड, मारोती पिल्लेवाड,सुभाष टिगलवाड, गंगाधर टिगलवाड, अंकुश पिल्लेवाड,संभाजी डिवटेवाड, संदिप पिल्लेवाड,मारोती पिटु पिल्लेवाड ,प्रकाश पिल्लेवाड ,चाॅदराव  पिल्लेवाड ,अनिल कंदेवाड यांच्यासह अनेक गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह महिला भगिनी व बाल गोपाल हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या