Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद येथे सारथीचे विभागीय कार्यालय आणि वस्तीगृह लवकरच सुरु होणार -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण


  औरंगाबाद, – शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘सारथी’छत्रपती शाहू महराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या विभागीय कार्यालय व वसतिगृह औरंगाबाद येथे सुरु होणार आहे. यासाठी शहरातील सद्य स्थितीत वापरात नसलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या सभागृहाची इमारत ही सारथीच्या विभागीय कार्यालयासाठी ताब्यात घेतलेली आहे. तसेच शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या मुलां-मुलींचे बंद असलेल्या वसतीगृहाची इमारत ‘सारथी’ संस्थेच्या वसतीगृहा करीता ताब्यात घेतलेली आहे. दोन्ही इमारतीची किरकोळ दुरुस्तीची कामे तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करुन घेण्याबाबतची कार्यवाही सुरु केली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी सारथीचे कार्यालय सुरु करण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने छत्रपती शाहू महराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ‘सारथी’ या संस्थेची स्थापना मराठा, कुणबी व कुणबी मराठा या लक्षीत गटाच्या शैक्षणिक व आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी शासनाने स्थापन केलेली आहे.
या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यालय सुरु करण्याबाबत घेतलेल्या निर्णयानुसार औरंगाबाद येथे ‘सारथी’ संस्थेचे विभागीय कार्यालय सुरु करण्यासाठी जागा व कार्यालय शासनामार्फत उपलब्ध करण्यात आली आहेत. अल्प कालावधीत सारथीचे विभागीय कार्यालय व वसतीगृह औरंगाबाद शहरात सुरु होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या