Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद पंचायत समितीवर फडकला भाजपचा झेंडा; सभापती छाया घागरेंचा काँग्रेसला रामराम


औरंगाबाद : औरंगाबाद पंचायत समितीवर अखेर भाजपचा झेंडा फडकला आहे. पंचायत समितीच्या सभापती छाया घागरे यांनी सोमवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचेच उपसभापती अर्जुन शेळके यांनी दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे आता औरंगाबाद पं. स.वर भाजपचा झेंडा लागला आहे.केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी विधानसभाध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत बनगाव (तालुका औरंगाबाद) येथे सोमवारी भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सभापती छाया घागरे यांच्यासह सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भास्कर मुरमे, माजी सरपंच राजू घागरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. तालुक्यातील या दिग्गजांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला घरघर लागल्याचे बोलले जात आहे. घागरे दांपत्यासह इतरांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे बळ कन्नड तालुक्यात निश्चितच कमी झाले आहे.यावेळी उपसभापती अर्जुन शेळके, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, सरपंच भास्कर मुरमे, बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे यांची भाषणे झाली. भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी केंद्राने केलेल्या विविध विकास कामांची माहिती देऊन पक्षाची भूमिका समजावून सांगितली. या कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, ज्येष्ठ नेते सज्जनराव मते, फुलंब्री पं. स. च्या सभापती सविता फुके आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या