Advertisement

Responsive Advertisement

धर्माबाद तालुक्यात विविध विकासकामाचे भूमिपूजन....


धर्माबाद: धर्माबाद तालुक्यात आमदार राजेश पवार यांची विकासात्मक घोडदौड ही राज्यस्तरीय, जिल्हा स्तरीय विविध विरोधी पक्ष व काही भाजपाच्या जिल्हास्तरीय नेत्यांना डोळ्यात सलत व खुपत असून आमदार राजेश पवार ह्यांच्या  मतदारसंघातील विकासात्मक कामाच्या धडाक्यामुळे जनतेचे प्रेम मात्र गुणाकाराच्या रूपात वाढत चालले असून यामुळे विरोधकांचे अक्षरशः धाबे दणाणले असून राजेश पवार यांच्या घौडदौडीचा वारु कसा रोखावा याच्यात अपयश आल्यामुळे आता फक्त जनतेत गैरसमज करण्याचे कामं तेवढे उरले असून नरसीच्या सभेतील हा एक राज्यस्तरीय नेत्याचा प्रयोग होता असे घणाघाती प्रतिपादन आमदार राजेश पवार यांच्या सुविद्य पत्नी तथा माजी जिल्हा परिषद सदस्यां पुनम ताई पवार यांनी धर्माबाद तालुक्यातील मौजे सालेगाव येथील जाहीर सभेत केले तेव्हा शेकडो लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
    धर्माबाद तालुक्यातील जवळपास तब्बल पाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित जाहीर सभेत पुनमताई पवार बोलत होत्या.
उपरोक्त जाहीर सभेच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बाजार समितीचे संचालक तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश अण्णा गौड, भारतीय जनता पक्षाचे अतिशय कृतिशील ठरलेले माजी तालुकाध्यक्ष विजय पाटील डांगे, नागनाथ पाटील जिंकले, चैतन्य घाटे, यांच्यासह प्रसिद्ध शासकीय गुत्तेदार संजय सवई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नरवाडे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 पुनम ताई पवार यांनी पुढे बोलताना म्हटले की एक आमदार दोन कामदार या आमच्या ब्रीद वाक्यला अनुसरून आमदार झाल्यानंतर रस्ता नाल्याचं नाही तर प्रत्येक विभागातील यामध्ये शैक्षणिक असो आरोग्य असो महसूल असो तेथील जनतेची कामे झालीच पाहिजे या प्रचंड भावनेतून एकही दिवस वाया न घालवता आमच्या दोघांचेही कार्य चालूच आहे. पांदण रस्त्याची मोहीम ही अवितर  चालूच राहणार असून आम्ही मतदारसंघासाठी दोन जेसीबी मशीननही उपलब्ध करून देणार आहोत फक्त लोकसहभागातूनभ गावांमधून त्यामध्ये डिझेल भरणे एवढेच गावकऱ्यांचे काम राहील व आपला विकास साधून घेतील. सलग दोन शैक्षणिक वर्ष वाया गेली त्यामुळे पालकांनी जागृत रहावेच व त्याच बरोबर कोरोना या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर लसीकरणही तेवढेच महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
 यापुढेही विकासकामे ही होतच राहणार त्याबद्दल आमदार राजेश पवार व मी स्वतः निधीसाठी शासन दरबारी जीवाचे रान करू पण मतदार संघाचा आज पर्यंतच्या इतिहासातील विकास काय असतो ते दाखवल्याशिवाय राहणार नाही असे रोखठोक प्रतिपादन केले.
काल धर्माबाद तालुक्यातील विविध विकास कामे व भूमिपूजन लोकार्पण सोहळे अंतर्गत आटाळा क्रं.१,२,३  पिंपळगाव फाटा, सालेगाव, करखेली, व चिंचोली एवढ्या गावातील विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळे संपन्न झाले त्यामुळे त्या-त्या विभागातील नागरिक अक्षरशः भारावले होते.
सालेगाव येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये पंचक्रोशीतील हजारो नागरिक आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच श्रीनिवास पाटील भुतावळे यांनी केले तर मनोगतात चौफेर फटकेबाजी माजी तालुकाध्यक्ष विजय डांगे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन काँग्रेसचे अवधूत पाटील भूतावळे यांनी आपल्या भारदस्त आवाजात व शब्दांकनांत करून विकासात्मक कामासाठी गावातील एकी अभेद्य असल्याचे उदाहरण दिले.
उपरोक्त तालुकाभर झालेल्या विकासात्मक कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त त्या-त्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ,ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित आणि शेकडो नागरिक त्या त्या ठिकाणी उपस्थित होते. ‌

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या