Advertisement

Responsive Advertisement

माजी आमदार बापूसाहेब गोरठेकरांनी घेतली शरद पवार यांची भेट

उमरी तालुका प्रतिनीधी.

उमरी;महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष .शरद पवार यांची मुंबई येथील वाय.बी.सेंटर येथे उमरी तालुक्यातील लोकप्रिय मा.आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी सदिच्छा भेट घेतली आहे.
स्व.गिरीश बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या कन्येच्या लग्न सोहळ्यात येण्याची पवार साहेबास विनंती केली,सदर जिल्ह्यातील काही कामानिमित्त आणी राजकीय परिस्थिती बाबद चर्चा केली.
यावेळी गोरठेकर साहेबा सोबत मराठवाडा राष्ट्रवादी शिक्षण संस्थांचे अध्यक्ष श्री.डाॅ.विक्रम देशमुख तळेगावकर,धर्माबाद नगरीचे विधमान उपनगराध्यक्ष श्री.विनायकराव कुलकर्णी, बिरापा मंदनुरकर ,रघुनाथ टेकुलवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या