Advertisement

Responsive Advertisement

शिवा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा..

धर्माबाद:- दरवर्षी प्रमाणे यंदाही कार्तिक शुद्ध पौर्णिमेला श्री क्षेत्र कपिधार येथील यात्रेनिमित्त शिवा संघटनेचा 26 वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा आयोजित केला आहे.तसेच प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट शासनाच्या वतीने 20 वी शासकीय महापूजा सपन्न होणार आहे.

दि 18 नोव्हेंबर रोज गुरुवारी दुपारी 3.30 वाजता 20 वी शासकीय महापूजा महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी धनंजय मुंडे, पालकमंत्री अशोक चव्हाण,व जयदत्त क्षीरसागर व बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून त्यानंतर ठीक4.00 वाजता प्रतिवर्षी प्रमाणे शिवा संघटनेचा 26 वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्याचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर उपस्थित राहणार आहेत. या शिवाय या भव्य राज्यव्यापी मेळाव्यात गुरुउपदेश देण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मठाचे मठधिपाती आवर्जून उपस्थित राहणार आहेत.या प्रसंगी महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी, मान्यवर व नागरिक बांधव या राज्यव्यापी महामेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे असे आव्हाहन धर्माबाद तालुक्याचे शिवा संघटना शोषल मीडिया चे ता.अध्यक्ष संतोष साखरे  यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या