Advertisement

Responsive Advertisement

वैजापूर बाजार समितीत भाजपची एकहाती सत्ता आणणार; पक्ष बैठकीत नेत्यांचा विश्वासऔरंगाबाद : शिवसेनेच्या वर्चस्वाची राजवट असलेल्या बाजार समिती निवडणूकीत कुठल्याही परिस्थितीत भाजपची एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजपचे प्रमुख पदाधिकारी एकजूट झाले आहेत. १८ सदस्यीय संचालक मंडळाची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा ठाम निर्धार भाजपा पदाधिका-यांनी केला आहे. येत्या २५ नोव्हेंबर पर्यंत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी मतदार संघनिहाय पक्षाकडे लेखी अर्ज सादर करण्याच्या सूचना पक्षामार्फत या बैठकीत देण्यात आल्या.सहकार क्षेत्रातील बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूकीत शिवसेनेकडे शेतकरी हिताच्या संस्थेचे सूत्र मतदारांनी त्यांच्या हाती सोपविले होते. मात्र संचालकातील अंतर्गत मतभेदांमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी या संस्थेत उपेक्षा अधिक झाली. त्यामुळे या संस्थेवर भाजपाचा झेंडा फडकलाच पाहिजे या भूमिकेतून येथील भाजपा कार्यालयात जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव , तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक स्वबळावर लढवायची की अन्य पक्षाशी युती करुन लढायची या विषयावर प्रमुख क्रियाशील कार्यकर्त्याची मते जाणून घेण्यासाठी विशेष बैठक पार पडली.मागील निवडणूकीत पक्षाचे नेते एकनाथ जाधव यांनी भाजपा कडून निवडणूक लढवण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम उमेदवार नसल्यामुळे त्यांनी निवडणूक रिंगणा पासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फटका पक्षासह निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांना बसला होता. त्यामुळे या निवडणूकीत बाजार समितीत भाजपाचे कोणत्याही स्थितीत एकहाती अस्तित्व निर्माण करण्यासाठी पक्षाचे नेते डॉ. दिनेश परदेशी, एकनाथ जाधव यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. भाजपा या निवडणूकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार यात कोणतीही शंका नाही असे डॉ.दिनेश परदेशी यांनी सांगितले.निवडणूकीसाठी सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल मापाडी, महिला राखीव या मतदार संघातून सक्षम उमेदवार देण्यासाठी चाचपणी केली जात आहे. निवडणूकीत सत्ता काबीज करण्यासाठी अन्य पक्षाशी वेळ पडल्यास युती किंवा आघाडीचा निर्णय सर्वानुमते घेऊ असे ते म्हणाले. निवडणूक लढवण्यासाठी किती जण इच्छुक आहेत. यांची चाचपणी करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी असलेल्या मंडळीने २५ नोव्हेंबर पर्यंत पक्षाकडे कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार यासाठी पक्षाकडे लेखी अर्ज सादर करावा असे त्यांनी सांगितले. इच्छुकांची संख्या तपासून निवडणूकीची रणनीती ठरवू असे ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या