Advertisement

Responsive Advertisement

बेघरांच्या आयुष्यात फुलले दोन क्षण सुखाचे; मनपाच्या बेघर निवारागृहात दिवाळीचा जल्लोष
औरंगाबाद : दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव. मात्र प्रत्येकाच्याच आयुष्यात हा सण प्रकाश आणेलच असे नाही. या जगात अशी अनेक माणसे असतात ज्यांचे कुटूंब नसते, घर नसते. अशा लोकांनीही दिवाळीचा आनंद अनुभवता यावा यासाठी बेघर निवारा केंद्राने सकारात्मक पुढाकार घेतला आहे. शहरातील गांधीनगर, रेल्वे स्टेशन, चिकलठाणा एन-६ सिडको येथील निवारागृहात दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.ज्यांना राहायला घर नाही, कपडे नाहीत, वैद्यकीय सुविधा नाहीत अशांच्या आयुष्यामध्ये कायम अंधार असतो. मात्र औरंगाबाद महानगरपालिका आणि राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत चालविण्यात येत असलेल्या मोती कारंजा, गांधीनगर, रेल्वे स्टेशन, चिकलठाणा आणि एन-६ सिडको येथील शहरी बेघर निवारागृहात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.यावेळी फराळ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. बेघर लोकांच्या जीवनामध्ये आनंदाची आणण्यासाठी नृत्य, गीत, संगीत सादर करण्यात आले. यावेळी बेघरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. याप्रसंगी व्यवस्थापक सुरेंद्र पाटील, भारत मोरे, डॉ. फारुख पटेल, प्रशांत दंदे, प्रशांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या