Advertisement

Responsive Advertisement

देवगिरी महाविद्यालयातिल सेवानिवृत्तिनंतर भेटले जूने सहकारी, बावीस वर्षानंतर जमला जून्यांचा चाय कट्टा

औरंगाबाद - औरंगाबाद येथिल देवगिरी महाविद्यालयातिल 
वयोवृद्ध जेष्ठ प्राध्यापक आपल्या सेवेच्या नंतर तब्बल २२ वर्षानंतर स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं आज  मंगळवार  रोजी येथिल स्नेहभेट कार्यक्र आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण आयूष्य महाविद्यालयांमधून अध्यापनात घालवून आज कित्येक मोठमोठी तत्वज्ञ,संशोधक,प्राध्यापक ,डाक्टर घडवणारी ही तज्ञ मंडळी आहे  यात जेष्ठ समाजशास्रज्ञ प्रा.डॉ. द.धो.काचोळे, प्रा. श्रीधरराव सातपुते, प्रा.डॉ. विनायकराव सोळुंके, डॉ. श्रीराम जाधव, डॉ.अशोक नाईकवाडे, कॅप्टन प्रा.डॉ. भास्कर जाधव,प्रा.जयंत जाधव यांना एकत्र आणले आणि  त्यांच्याप्रति कृतज्ञ राहून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यासाठी त्यांचे विद्यार्थी असलेले व आज प्राध्यापक असलेले प्रा.डॉ. हरिराम सातपुते, प्रा.कैलास देशमुख,प्रा.अजय शहाने,प्रा.कैलास मोठे,प्रा.सुनील देशमुख,शिवाजी गायकवाड यांनी  परीश्रम घेतले व स्नेहभोजन करत जून्या आठवणीना उजाळा देत मिळालेले आयूष्य समाज,विद्यार्थी घडवण्यात व मार्गदर्शनात जावे अशी प्रांजळ इच्छा व्यक्त करत जीवनगाणे गातच राहावे असा योग कधी जूळवून यावा ही मोठी जीवनघटणा असल्याचे या प्रसंगी मार्गदर्शन करतांना प्रा.डॉ.श्रीधरराव सातपूते ( तात्या) यांनी आपले विचार व्यक्त करतांना म्हणटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या