Advertisement

Responsive Advertisement

शिवानंद पांचाळ यांची दिवाळी माणुसकी सोबत...

नायगांव /प्रतिनिधी

 नायगांव‌ - बाजार ता‌.१४ नोव्हेंबर,) शिवानंद पांचाळ यांनी घडविले माणुसकीचे दर्शन -  गोर गरिब - वयोवृद्ध, अनाथ,वंचित गरजुंपर्यंत पोहोचून त्यांच्या मदतीसाठी काही वर्षांपासून मदतीचे दातृत्वचे घेतलेल्या राज्याचे दुसरे माजी मुख्यमंत्री स्व. कर्मवीर मा. सा. दादासाहेब कन्नमवार यांचे पणतू तथा रोटी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. रोहित दादा माडेवार हे कपडे असो की किराणा असो की अन्य अनाथ गरीब मुला‌- मुलींचे शिक्षण असो, व अनाथ वृद्धांच्या पालनपोषणाची व्यवस्था, असो, कि अन्य कुठलाही मदत असो त्यांच्या मदतीचा वसा सुरूच असून आज दीपावली निमित्त त्यांच्या रोटी फाऊंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष - शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी गरीब‌ गरजूंची दिपावली आनंदात साजरी व्हावी यासाठी मिठाई - फराळाचे व इतरही वस्तूंची सन्मानपूर्वक भेट देऊन गरीब गरजुंची दिवाळी साजरी केली, समाज उपयोगीअनोखा उपक्रम राबवित पांचाळ हे रोटी फाउंडेशनचा दीपोत्सव साजरा केले , मागील काही वर्षापासून वंचित गरजु कुटुंबापर्यंत नायगांव येथील रोटी फाऊंडेशन चे मराठवाडा अध्यक्ष पांचाळ शिवानंद दत्तात्रय यांचा मदतीचा यज्ञ नित्याने सुरू आहे, मराठवाड्याच्या मदतीच्या यज्ञात शिवानंद पांचाळ हे नांव अनेकदा दिसून येते आहे, बेवारस मनोरुग्न असो, किंवा बेघर अनाथ वयोवृद्ध असो, किंवा दारात कोणीही नडलेला आला तर शिवानंद ची मदत होणारच या पलीकडे त्यांनी  कोल्हापूर - सांगली येथील  पूरग्रस्तांसाठी आर्थिक सहकार्य म्हणून जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे देवू केले, शिवानंदच्या सर्वच गोष्टींचा उल्लेख कमी शब्दात करता येणार नाही, रोटी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ रोहित माडेवार साहेब यांच्या सहकार्यातून पांचाळ यांनी नेहमी करत असलेल्या समाज उपयोगी  आगळ्यावेगळ्या उपक्रमाने शहरात व विविध क्षेत्रातून चांगलीच वाहवाह होताना दिसत आहे, यावेळी शिवानंद पांचाळ नायगांवकर म्हणाले मी एक सामान्य माणूस आहे सामान्य माणूस म्हणून काम करत आहे,  निराधार दिव्यांग वयोवृद्ध बेघर मनोरूग्ण गरीब गरजू मध्येच देव आहे, समजून मी सामान्य माणसाला आधार देण्यासाठी रोटी फाउंडेशन च्या वतीने छोटासा प्रयत्न करत आहे, शंभर टक्के समाजकारण हा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय कर्मवीर मा.सा. दादासाहेब कन्नमवार यांचा वारसा घेऊन काम करत आहे, असे मत रोटी फाऊंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष शिवानंद पांचाळ यांनी मांडले आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या