Advertisement

Responsive Advertisement

पीसीपीएनडीटी, एमटीपी कायदा उल्लंघनाबाबत माहिती देणाऱ्यास बक्षीस योजना


 औरंगाबाद : गर्भधारणा पूर्व व प्रसुती पूर्व निदान तंत्रे प्रतिबंधात्मक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती ,केंद्र, संस्था, पीसीपीएनडीटी कायद्यातील कलम 22 नुसार जाहिराती करणा-या व्यक्ती, पुस्तके, प्रकाशन, संपादक, वितरक इ. विषयाची माहिती समुचित अधिकारी यांना मिळणे आवश्यक आहे. अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीस त्यांनी दिलेल्या माहितीची खातरजमा करुन व त्याअनुषंगाने नंतर संबंधित सोनाग्राफी केंद्रावर, व्यक्तीवर खटला दाखल केल्यावर संबंधित माहिती देण्याऱ्या व्यक्तीस रु. 1 लाखाप्रमाणे बक्षीस देण्यात येईल. बक्षीसास सामान्य नागरिक, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यापैकी किंवा इतर कोणतीही व्यक्ती पात्र असू शकेल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.
 जिल्हा, महानगरपालिकेने या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कोर्ट केस नंबरसह संपूर्ण कार्यवाही झाल्याची खातरजमा करुनच माहिती देण्याऱ्या संबंधितांना नमूद बक्षीसाची रक्कम वितरीत करण्यात येईल. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 प्रभाविपणे राबविण्यात येत आहे.  त्यानुसार सर्व केंद्राची नियमितपणे तपासणी करण्यात येत असते. मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रामध्ये वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन होत असेल किंवा एखाद्या अमान्यप्रापत काही अवैधारित्या गर्भपात केले जात असतील किंवा अपात्र व्यक्ती गर्भपात करत असतील अशा केंद्राची माहिती देणाऱ्या संबंधित व्यक्तीलाही रक्कम रु. 1 लाख बक्षीस दिले जाईल. वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन झाल्याचे माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकारी यांनी केंद्राची तपासणी करुन कायदा भंग झाल्याचे निष्पण्ण झाल्यास व पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल केल्यानंतरच बक्षीसाची रक्कम माहिती देणाऱ्यास अदा केली जाईल. 
 याकरिता शासनाची हेल्पलाईन क्रमांक 18002334475 तसेच संकेत स्थळ www.amchimulgi.gov.in यावर तक्रार करु शकता. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद किंवा आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका, औरंगाबाद यांना लेखी तक्रार करता येईल, असेही त्यांनी कळविलेले आहे.
****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या