Advertisement

Responsive Advertisement

सेना नेते खैरे यांनी आयोजित केलेल्या जेष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या गीत रामायणास उस्फुर्त प्रतिसादऔरंगाबाद :  शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे, युवासेनाप्रमुख, पर्यटनमंत्री . आदित्य ठाकरे, पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री . सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वज दिवाळी निमित्ताने शिवसेना च्या वतीने जेष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांच्या गीत रामायणाचे आयोजन रुख्मिनी सभागृह, एमजीएम येथे केले होते. या कार्यक्रमास  रसिक श्रोत्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संयोजन केलेल्या कार्यक्रमास रुख्मिनी सभागृह भरगच्च भरले होते.
  या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, आमदार प्रदीप जैस्वाल,  महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्कसंघटक सुनीता देव, जिल्हा समनव्यक कला ओझा, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, नंदकुमार घोडेले, संतोष जेजुरकर, राजू राठोड, बंडू ओक, आनंद तांदुळवाडीकर, गणू पांडे, बाप्पा दळवी, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, बाबासाहेब डांगे, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक आणि शिवसेना, युवासेना, भाकासे, शिक्षक सेना महिला आघाडी व शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या