Advertisement

Responsive Advertisement

रब्बी पेरणीला लागणाऱ्या बियांची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर तारगे यांचे आव्हान ,


गंगापूर प्रतिनिधी

गंगापुर तालुक्यातील
टोकी बर्गीपुर येथे हरबरा बियानास बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविताना एन ए आर पी औरंगाबाद चे प्रमुख शास्त्रज्ञ श्री एस बी पवार, उपस्थित तालुका कृषी अधिकारी  ज्ञानेश्वर एस तारगे , तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की रब्बी पीक हरभरा ज्वारी गहू ह्या बियाण्याची पेरणी करते करते वेळी अगोदर बीजप्रक्रिया करूनच करावी यावेळी प्रभारी मंडळ कृषी अधिकारी श्री एस जी बंडगर , कृषी पर्यवेक्षक ज्यांनी कृषी अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध माध्यमातून योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले श्री के आर पाठक, कृषि सहायक डी एन रोडगे, वडगाव टोकी  सरपंच  दत्ताभाऊ कानकाटे, प्रगतशील शेतकरी भगवान कानकाटे, बजाज जलसंधारण जलमित्र भाऊसाहेब मोतकर, कृषिमित्र बाबासाहेब मते,व शेतकरी यावेळी  पवार  यांनी बीजप्रक्रिया चे महत्त्व, रोग कीड यावर मार्गदर्शन केले, प्रास्तविक बोलताना डी एन रोडगे कृषी सहायक वडगाव यांनी म्हणाले की यावर्षी आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला व रब्बी पिके केले मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊ शकते तर आभार प्रदर्शन कृषी मित्र बाबासाहेब मते यांनी शेतकऱ्यांची अडचण अतिवृष्टी मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीचे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे असे त्यांनी सांगितले  यावेळी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्य नितीन शेजवळ ज्ञानेश्वर भुसारे मुक्तराम वाघचौरे, विलास पिठले उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या