Advertisement

Responsive Advertisement

धर्माबाद तालुक्यात पंचायत समिती च्या वतीने नवीन विहीरीचे जलपुजन व शुभारंभ ;धर्माबाद:- देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभर विविध कार्यक्रमाद्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. नांदेड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हा अधिकारी डाॅ विपीन इटनकर साहेब,माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय वर्षा ठाकूर मॅडम तसेच सभापती कृषि व पशुसंवर्धन संवर्धन समिती बाळासाहेब पा. रावणगाव कर व जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ .तानाजी चिमणशेटे यांच्या निर्देशानुसार आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१रोजी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत व आझादी के ७५ साल अमृत महोत्सवा निमीत्त  जिल्ह्यामध्ये नवीन सिंचन विहिरीचे तसेच तसेच जुन्या विहिरीचे जलपूजन याचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्या आदेशानुसार  धर्माबाद तालुक्यात मौजे येताळा येथे सावित्रीबाई पिराजी ऐंगलोड यांच्या विहीरीचा जल पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला .सदर कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा मा.पदमारेड्डी सतपलवार ह्या उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे राष्ट्रीय कृषी विकास योजना अनु. जमाती अंतर्गत नवीन सिंचन विहीर मौजे समराळा येथे श्रीमती  राजाबाई भोजमोड यांच्या नवीन सिचन  विहीरीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला याचा मा .श्रीमती पदमारेड्डी सतपलवार याच्या हस्ते करण्यात आला. तसेच  मौजे राजापूर येथे सभापती पंचायत समिती मारोती कागेरू  व उपसभापती चंद्रकांत वाघमारे  यांच्या हस्ते गंगाधर चरकेवाड यांच्या नवीन सिंचन विहीरी चा जल पूजनाचा तसेच सौ. ज्योती जगजीवन पिटलेवाड  यांच्या नवीन सिचन विहिरीचा कामाचा शुभारंभ करण्यात आला. व राजापूर येथील नविन सिंचन विहीरी वरच क्रांतीकारी बिरसा मुंडा यांची प्रतिमा लाऊन पुजा पाठ करून  जयंती साजरी करण्यात आली यावेळी पंचायत समिती सभापती, उपसभापती , पंचायत समिती कृषी विभागाचे विश्वास अधापूरे,गावातील नागरीक, अनेक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या