Advertisement

Responsive Advertisement

माळीवाडा येथे ग्रामपंचायतीच्या वतिने लसीकरण जनजागृती करत लस घेण्याचे आवाहन

दौलताबाद प्रतिनिधी -  हर घर दस्तक अंतर्गत मिशन कोविड लसिकरण मोहीम माळीवाडा येथे दि.24ते 26 नोव्हेंबर 2021 चे प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी गावात ग्रामपंचायतीने लाऊडस्पीकर द्वारे आवाहन करण्यात आले.यानंतर प्राथमिक शाळेतिल विद्यार्थ्यांची प्रभात  फेरी काढण्यात आली.त्यात घोषवाक्य फलक व घोषणा द्वारे आवाहन करण्यात आले.यावेळी सरपंच अनिता हेकडे, उपसरपंच कडु किर्तीकर, भाऊसिंग गुसिंगे मंडळ अधिकारी, शिवाजी साळुंके विस्तार अधिकारी, ठाकरे सर केंद्र प्रमुख,  जी व्ही हारदे ग्रामविकास अधिकारी,प्रवीण बर्डे, मधुकर मुळे तलाठी, प्रमोद साठे पोलीस पाटील, मनिष फुलारे , मिनल कोंबळे आरोग्यसेविका,जी बी आधाने सर मुख्याध्यापक, शिक्षक/शिक्षिका, ज्योती हेकडे आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी कार्यकर्ती/मदतनिस,आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश आस्वार,यादव शिनगारे, सुभाष शिंदे, कैलास भगत, अमोल साठे या सर्वानी विशेष परिश्रम घेतले मोहीम यशस्वी होऊन नागरीकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन लसिकरण करुन घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या